प्रमुख खरीप पिकांतील आंतरमशागतीची कामे–
१) सोयाबीन:- सोयाबीनमध्ये झाडांची मुळे वरच्या थरात वाढलेलीअसतात म्हणून आंतरमशागत करताना या मुळांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. डवरणीकरतांना या तंतुमय मुळांची वाढ पाहून घ्यावी. साधारणतःपिकांचीपेरणीझाल्यापासून४०दिवसांपर्यंत म्हणजेच फुले येण्याच्या पूर्वी आंतरमशागत उरकून घ्यावी. त्यात दोन डवऱ्याचे फेर महत्वाचे आहेत. निंदण तणांचा प्रादुर्भाव पाहूनच करावे. तणनाशकांचा वापर केला असल्यास निंदणीची गरज भासणार नाही. सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा पद्धतीने केलेली नसल्यास ४ – ५ तासांच्या आड डवरा झाल्यानंतर डवऱ्याला दोरी बांधून दांड काढून घ्यावे. नंतरच्या काळात पिकाच्या वर आलेले तण उपटून घेत राहावे.
सोयाबीनमध्ये तणनाशकांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत असून उगवणीनंतर एमीथीथायपर ( परसूट ) किंवाक्विझालोफोप( टरगा सुपर) किंवाओडिसीया तणनाशकांचा शिफारशीत वापर करावा.
२) कापूस :- कापूस पिक उगवणीनंतर ३ ते ४ दिवसांनी ताबडतोब खडे किंवा नांगे भरावेत. तसेच बी उगवणीनंतर १५ ते २० दिवसांच्या आत विरळणी करूनझाडांची योग्य संख्या राखावी. कपाशीच्या पिकास आवश्यकतेनुसार ३ ते ४ वेळा डवरणी करावी. कपाशीचे पिक पहिले ६० ते ७० दिवस तण विरहीत असणे फायदेशीर ठरते, त्यासाठी तणांचा प्रादुर्भाव पाहून एक ते दोन वेळा निंदणी करावी. कपाशीचे पिक वाढीच्या अवस्थेत असतांना किंवा शेवटच्या डवरणीच्या वेळी डवऱ्याच्या दातांना दोरी बांधून सरीकाढावी, जेणेकरून पाण्याचे मुल्स्थानी संधारण होऊन अधिक उत्पन्न मिळते. पेरणीनंतर ४० ते ६० दिवसांनी सऱ्या काढाव्यात. गरज भासल्यास शिफारस केलेल्या तणनाशकांचीयोग्य वेळी व योग्य प्रमाणातच फवारणी करावी. नत्रयुक्त खतांचा वरखते म्हणून वापर करतांना बागायती कपाशीसाठी१/३ नत्राची मात्रा उगवणीनंतर एक महिन्यांनी व उरलेली १/३ नत्राची मात्रा उगवणीनंतर दोन महिन्यांनी द्यावी. ठिबक संचातून खतमात्रा देतांना ती पिकाच्या वाढ अवस्थेनुसार लागवडीपासून१५ दिवसाच्या अंतराने समान सहा भागात द्यावी.
३) ज्वारी–खरीप ज्वारीच्या उत्पादन वाढीस आंतरमशागतीचे फार महत्व आहे. पेरणीपासून१२ ते १५ दिवसांनी विरळणी करावी. त्यासाठी दोन झाडांतील अंतर १० ते १२ से.मी इतके ठेवावे व हेक्टरी झाडांची संख्या १.८० लाखापर्यंत ठेवावी. ज्वारीचे पिक ४० दिवसांचे होईपर्यंत २ – ३ कोळपण्या वखुरपण्या कराव्यात. तणांचाजास्त प्रादुर्भाव असल्यास एखादे निंदण करावे. वरखते म्हणून ४० किलो नत्र / हे. ( ८७ किलो युरिया ) ज्वारीचे पिक २५ ते ३० दिवसांचे झाल्यानंतरद्यावे.
४) धान( भात) –धान पिकामध्ये आंतरमशागतीची कामे पिक निसवण्यापूर्वी एक महिन्या अगोदर संपवावी. तणांच्या नियंत्रणासाठी धान रोवणीनंतर५ ते ६ दिवसांनी ४ लिटर ब्युटाक्लोर + ५०० लिटर पाणी प्रती हेक्टरी या प्रमाणात वापरावे किंवा लावणीनंतर सुमारे १५ दिवसांनी कोळपणी व निंदणी करून २ ते ३ आठवड्यांनीपुन्हा एक कोळपणी व निंदणी करूनपिकतणविरहीत ठेवावे. नत्राची अर्धी मात्रा वरखते म्हणून दोन समान हप्त्यात( फुटवेफुटण्याच्या वेळी व लोंबी येण्याच्या सुरुवातीस ) विभागून द्यावी.
५) मका–मक्याच्या दोन झाडातील अंतर विरळणी नंतर१५ ते २० से.मी राहील याची काळजी घ्यावी. पिक ४० दिवसाचे होईपर्यंत या पिकास २ ते ३ डवरण्या व निंदण करून पिकतणविरहीत ठेवावे. नत्रयुक्त खतांची हेक्टरी ४० किलो नत्रपेरणीनंतर ३० दिवसांनी व राहिलेले ४० किलो नत्र पेरणीनंतर५० दिवसांनी द्यावे.
६) भुईमुग–भुईमुग या पिकामध्ये पिक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये साधारणतः ६ ते ७ आठवड्यापर्यंत आंतरमशागत करून शेत भुसभुशीत ठेवावे. त्याकरिता ३ वेळा डवरणी आणि आवश्यकतेनुसार २ – ३ वेळी निंदणी करावी. वाण परत्वे शेवटच्या डवरणीच्या वेळी पिकास मातीची भर द्यावी किंवा ८ ते ९ आठवड्याचे पिक झाले कि पिकावर ड्रम फिरवावा व आऱ्या सुटल्यानंतर आंतरमशागत करू नये.भुईमुगाचे पिक फुलोरा अवस्थेत असतांना हेक्टरी३०० ते ५०० किलोजिप्सम दिल्यास उतपादानात वाढ होते.
७) सुर्यफुल व तीळ–या दोन्हीही तेलवर्गीय पिकांमध्ये आंतरमशागतीमध्ये प्रामुख्याने १५ ते २० दिवसांनी विरळणी करणे खूप महत्वाचे असते. योग्य वेळी विरळणी करून एका ठिकाणी एकच जोमदार रोपटे ठेवावे. विरळणीस जास्त उशीर करू नये. सुर्यफुल या पिकात नत्राचा दुसरा हप्ता पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांनी द्यावा. तसेच तीळ पिकामध्ये नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावा. आवश्यकतेनुसारदोन्हीही पिकांमध्ये २ ते ३ कोळपण्या व खुरपण्या आणि निंदन देऊन शेत स्वच्छ ठेवावे.
८) ऊस –ऊस हे पिक जास्त कालावधीचे असल्यामुळे या पिकात आंतरमशागतीला खूप महत्व आहे. ऊस पिकामध्ये गरजेनुसार खुरपण्या द्याव्यात. पिक दोन महिन्याचे झाल्यानंतर दातेरी कोळप्याने बाळ बांधणीआणि चार ते साडेचार महिन्यानंतर रीजरने पक्की बांधणी करावी. वरखतेदेतांना सुरु हंगामाच्या ऊसामध्ये ८ ते १० आठवड्यांनी १०० किलो नात्र तसेच ५० किलो स्फुरद व पालाश यांची मात्र द्यावी. ऊसाच्या हंगामानुसार रासायनिक खतांच्या मात्रा विभागून द्याव्यात.
या बरोबरच आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य पिक व आंतरपिकांचे ओळीचे प्रमाण इत्यादी बाबींचा विचार करून आंतरमशागतीच्याकामांचेनियोजनकरावे.खरीप पिकांतील व आंतरमशागतीच्या कामाबरोबरच या हंगामात येण्यात येणारी विविध भाजीपाला पिके तसेच नवीन व जुन्या फळबागांमध्ये सुद्धा गरजेनुसार आंतरमशागतीची कामे प्राधान्याने करून जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.