Saturday, December 14, 2019
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result

हळद – कंदकुज रोगाचे करा वेळीच नियोजन

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
September 12, 2019
in बातम्या
1
हळद – कंदकुज रोगाचे करा वेळीच नियोजन
18
SHARES
2.2k
VIEWS
Share On WhatsaapShare on FacebookShare on Twitter

सध्या पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे हळदीच्या शेतात पाणी साचून राहिल्याने कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. हा रोग बुरशी किंवा जिवाणूंमुळे होतो. कंद्कुज बुरशीजन्य आहे कि जिवाणूजन्य आहे ते ओळखून मगच नियंत्रणाचे उपाय करावेत.

बुरशीजन्य कंदकुज प्रतिबंधासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस दोन ते अडीच किलो प्रतिएकरी २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून दोन महिन्याच्या अंतराने दोन ते तीन वेळा वापरावे. पाण्याचा योग्य निचरा ठेवावा.कंदकुजीस सुरुवात झाल्यानंतर कॉपर ऑक्झी क्लोराईड ४ ते ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून किंवा १ % बोर्डो मिश्रणाची आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटालॉक्झिल ८% अधिक मॅन्कोझेब ६४% ( संयुक्त बुरशीनाशक ) ४ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळूनआळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी.

जिवाणूजन्य कंदकुज ओळखण्यासाठी रोगग्रस्त पाल्याचा भाग धारदार ब्लेडने कापून स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याचे टोक त्यामध्ये बुडवावे, त्यामधून दुधासारखा स्त्राव पाण्यामध्ये आल्यास जिवाणूजन्य कंदकुज आहे हे ओळखावे.जिवाणूजन्य कंदकुज असल्यास स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.

ढगाळ वातावरण सतत राहिल्यास आणि आर्द्रता ९० % चे वर राहिल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झी क्लोराईड ३ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझील १ मि.ली. प्रतिलिटर पाण्यात मिसळूनफवारणी करावी. फवारणीच्या द्रावणात सर्फेक्टंटचा वापर करावा.

सौजन्य:- डॉ. देविकांत देशमुख, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Tags: Turmeric - Timely planning of tuberculosisहळद – कंदकुज रोगाचे करा वेळीच नियोजन
Previous Post

केंचुआ करता क्या है ?

Next Post

सुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक व प्रक्रिया

Next Post
सुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक व प्रक्रिया

सुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक व प्रक्रिया

Comments 1

  1. Shrikant kalar says:
    3 months ago

    Hi

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

ताज्या पोस्ट

रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांचे कीड व्यवस्थापन

रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

by Kalpesh Chaudhari
December 12, 2019
0

रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन- कोबीवर्गीय पिकांतील रोग व्यवस्थापन

रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन- कोबी व फुलकोबी

by Kalpesh Chaudhari
December 10, 2019
0

रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांवरील रोग व्यवस्थापन - कांदा व लसूण , वाटाणा

रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांवरील रोग व्यवस्थापन – कांदा व लसूण , वाटाणा .

by Kalpesh Chaudhari
December 8, 2019
0

रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांवरील रोग व्यवस्थापन

रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांवरील रोग व्यवस्थापन – टोमॅटो

by Kalpesh Chaudhari
December 6, 2019
0

थंडी आणि फालंची क्रॅकिंग

थंडी आणि फळांची क्रॅकिंग

by Kalpesh Chaudhari
December 5, 2019
0

मोहरी पिकाची सुधारित पद्धतीने लागवड

मोहरी पिकाची सुधारित पद्धतीने लागवड

by Kalpesh Chaudhari
December 4, 2019
0

कापूस वेचणी साठवणूक आणि प्रतवारी

कापूस वेचणी, प्रतवारी आणि साठवणूक करतांना घ्यावयाची दक्षता

by Kalpesh Chaudhari
December 3, 2019
0

शेती अवजारे व उपकरणे - जीआयसी सायलो उपयुक्त

शेती अवजारे व उपकरणे – जीआयसी सायलो उपयुक्त

by Kalpesh Chaudhari
November 30, 2019
0

शेती अवजारे व उपकरणे- उसशेतीसाठी कृषीयंत्रे

शेती अवजारे व उपकरणे – उसशेतीसाठी कृषीयंत्रे

by Kalpesh Chaudhari
November 28, 2019
0

मत्स्यशेती

मत्स्यशेती

by Kalpesh Chaudhari
November 27, 2019
0

Prev Next

Recent Comments

  • Girish Khadke on शेतकऱ्यांना प्रति महिना ३००० रुपये पेन्शन
  • Shrikant kalar on हळद – कंदकुज रोगाचे करा वेळीच नियोजन
  • Shriniwas Namdeo patil on अपनी खाद (उर्वरक) के बारे में कैसे जानें और उसकी क्षमता को कैसे बढ़ायें ?
  • Sachin on आले लागवड कशी व केंव्हा करावी
  • म तू शेटे on लिंबू फळबाग लागवड.
  • Home
  • Home

© 2019

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2019